गुगलच्या अनेक प्रोडक्टपैकी एक परिणामकारक प्रोडक्ट म्हणजे ‘गुगल ड्राईव्ह’ प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये गुगल ड्राईव्ह हे ॲप्लिकेशन आपल्याला सापडेलच. पण जर तुमच्या मोबाईलमध्ये नसेल तर ते तुम्ही प्ले स्टोअरवरूनही डाऊनलोड करून घेऊ शकता. शैक्षणिक दृष्टिकोनातून गुगल ड्राईव्हचा विचार करता हे आपल्यासाठी खूप उपयोगी ॲप्लिकेशन ठरू शकतं. आपल्याला वर्गातील अनेक मुलांचे फोटो, त्यांच्या संदर्भातल्या माहितीची फाईल, व्हिडिओज, पीपीटी स्टोअर करून ठेवायचे असतील तर गुगल ड्राईव्ह आपल्याला फायदेशीर आहे. तसंच त्या फाईल्स आपण डाऊनलोड किंवा इतरांना शेअरही करू शकतो. त्यामुळं त्या फाईल कुठं घेऊन फिरण्याची, साठवून ठेवण्याची, हरवलं तर शोधण्याची गरज नाही.
यासाठी एक उदाहरण देतो समजा, एका मुलाची आपल्याला संपूर्ण माहिती साठवून ठेवायची आहे तर गुगलमध्ये अशी व्यवस्था असते की, आपण याच्यामध्ये स्वतंत्र फोल्डर नावानिशी बनवू शकतो. त्या विद्यार्थ्याच्या वर्षभरात केलेल्या उपक्रमांना ड्राईव्हमध्ये त्याच्या नावाच्या फोल्डर मध्ये आपल्याला साठवता येईल. त्याच्या अॅक्टिव्हिटीजचे फोटो, व्हिडिओ असतील किंवा त्याच्या गुणवत्तेची एक्सेल शीट असेल तर ते आपण एकत्र फोल्डरमध्ये ठेवू शकतो. जेव्हा गरज लागेल तेव्हा आपण अपडेट करू शकतो. पालकांना त्याची अभ्यासातील प्रगती सांगायची असेल तर या ड्राईव्ह मधील त्या नावानिशी तयार केलेल्या फोल्डरची शेअरेबल लिंक देऊन पाठवू शकतो. यामुळे शिक्षकांना ही सर्व माहिती सोबत घेऊन फिरण्याची, ही माहिती हरवण्याची भीती किंवा साठवण्याचीसुद्धा गरज नाही. गुगल ड्राईव्ह च्या माध्यमातून आपल्याला 15 जीबी पर्यंत फाइल्स स्टोअर करता येतात त्याही अगदी मोफत. Google Drive ही एक विनामूल्य क्लाऊड आधारित स्टोरेज सेवा आहे. गुगल ड्राइव्ह सेवा मोबाईल, टॅब्लेट, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरवरही वापरता येते.
गुगल ड्राईव्हचा खूप महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण गुगल फॉर्मच्या माध्यमातून माहिती संकलित करू त्याचं विश्लेषण करू शकतो. गुगल फॉर्म विषयी सविस्तर माहिती येत्या काही दिवसात पाहणार आहोत. धन्यवाद!
Share Post