शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती (भाग 2)
मागील भागामध्ये आपण पाहिलं की, मोबाईल वरती शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी करावी या संदर्भातली माहिती. आजच्या लेखामध्ये कॉम्प्युटरच्या किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून व्हिडिओ निर्मिती कशी करायची हे पाहणार आहोत. अनेकदा मोठमोठे व्हिडिओ एडिट करताना मोबाईलपेक्षा कॉम्प्युटर जास्त उपयुक्त ठरतो. अनेक असे सॉफ्टवेअर्स आहेत की, ज्या माध्यमातून एडिटिंगच्या जास्तीत जास्त गोष्टी करता येतात. कॉम्प्युटरवर व्हिडिओ निर्मिती करण्यासाठी विंडोज मूव्ही मेकर, हिट फिल्म एक्सप्रेस, ओपन शॉट यासारखे फ्री सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत तर वंडरशेअर फिल्मोरा, कॅम्टेशिया यासारखी पेड सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत. सहाजिकच पेड सॉफ्टवेअरमध्ये फ्री पेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतात. ज्यामुळे व्हिडिओ निर्मिती अगदी प्रोफेशनली करणं शक्य होतं.
कॉम्प्युटरवर व्हिडिओ निर्मिती करण्याचा फायदा हा असतो की, मोबाईलमध्ये येणारे स्टोरेजची मर्यादा इथे काही प्रमाणात का होईना सोडवली जाते. तसेच खूप व्हिडिओ मोठ्या साईजचे व्हिडीओ कॉम्प्युटर करणंही सोयीचं होतं. एडिटिंग करताना कॉम्प्युटरची असलेले स्क्रीन ही मोठी असल्यामुळे आणि बारीक सारीक चुका आपल्याला या माध्यमातून कमी करता येऊ शकतात ज्यामुळे व्हिडिओ कॉलिटी मेंटेन करणे शक्य होतं.
आज लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण देताना व्हिडिओ निर्मिती गरजेची आहे हे लक्षात आलं असेलच. अनेक वेळा मोबाईलवर ज्या गोष्टीला मर्यादा येतात त्या सगळ्या गोष्टी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्हिडीओ निर्मितीच्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण पूर्ण करू शकतो. खासकरून क्रोमा इफेक्ट देण्यासाठी आपल्याला अशा सॉफ्टवेअरची जास्त मदत होऊ शकते.
Share Post