शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाच्या संदर्भात वेगवेगळे प्रयोग सध्या चालू आहेत. त्यातलाच एक प्रयोग म्हणजे फोर डी ॲप्लिकेशनचा वापर करून अध्ययन आणि अध्यापन करणं होय. शिक्षक व मुलं वर्गात, घरी बसून किंवा हातामध्ये मोबाईल घेऊन अनेक गोष्टी आपल्याला 4D ऑग्मेंटेड रिॲलिटी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून अनेक बाबींवर अभ्यास करु शकतात. या लेखात शिक्षणामध्ये 4D चा वापर कसा करता येऊ शकतो हे काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून घेऊया.
4D अर्थात फोर डायमेन्शन. याचं उदाहरण द्यायचं झालं तर ॲनिमल फोर डी नावाचं ॲप्लिकेशन जर आपण आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केलं तर प्रत्यक्षात ज्या पद्धतीनं वेगवेगळे प्राणी हालचाल करताना आपण पाहू शकतो अगदी त्याच पद्धतीनं आभासी स्वरुपात या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहता येऊ शकतात. यासाठी आपल्याला या ॲप्लिकेशन मध्ये असणारी जी प्राण्यांची चित्रं आहेत त्यांचा वापर करावा लागतो आणि त्या प्राण्याचे चित्र जर तुम्ही समोर ठेवलं असेल त्याच्यावर जर तुमचा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कॅमेरा चालू केला तर चित्र निघून जाऊन त्या चित्रावर प्रत्यक्ष ते प्राणी आपल्याला जिवंत झाल्याचा आभास निर्माण करता येतो. उदाहरण द्यायचं झालं तर कुत्रा, मांजर, वाघ, सिंह, जिराफ, हत्ती, साप, मुंगी यासारखे लहान-मोठे प्राणी आपण प्रत्यक्ष असल्याचा अनुभव या अप्लिकेशन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहून घेऊ शकतो. पण या ॲप्लिकेशन व्यतिरिक्त असलेल्या चित्रांना मात्र हे पाहता येणार नाही. पण मुलांना खूप सारी चित्रं या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्षात प्राणी जिवंत करण्याचा अनुभव देण्यासाठी उपयोगी पडू शकतात. या प्राण्यांना आपण सर्व बाजूंनी पाहू शकतो, त्यांच्या हालचाली टिपू शकतो, त्यांचे आवाजही या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून मुलांना अनुभवता येतात आणि हे सगळे प्राणी प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव आभासी पद्धतीनं मुलांना देतो.
त्याचबरोबर आणखी एक ॲप्लिकेशन आहे ज्याचं नाव आहे Aura Interactive जे खास करुन इयत्ता तिसरी-चौथीच्या वरील वर्गांच्या मुलांसाठी उपयोगी पडणारं आहे. ते म्हणजे आपल्या सूर्यमालेसंदर्भातली माहिती यात अनुभवू शकतो. प्रत्यक्ष हे ग्रह कसे आहेत? ते सूर्याभोवती कसे फिरतात? सूर्यापासून कितव्या क्रमांकावर आहेत? त्यावरील सूर्याभोवती फिरण्यासाठी, स्वतःभोवती फिरवण्यासाठी किती कालावधी लागतो? गुरुत्वाकर्षण किती आहे? इ. गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. यात दिलेले ग्रहांचे फोटो आपण जर सूर्यमालेतील क्रमानुसार लावले तर हे सर्व ग्रह सूर्याभोवती त्यांच्या गतीनुसार कसे फिरतात हे अनुभवता येतं. हे मुलांना आभासी पद्धतीनं दाखवण्याचा एक छान अनुभव या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्याला देता येतो. असे खूपसे ॲप्लिकेशन्स सध्या प्ले स्टोअर वरती किंवा अॅपल स्टोअरवरती उपलब्ध आहेत. ते डाऊनलोड करून आपण मुलांना मोबाईलच्या माध्यमातून ऑग्मेंटेड रिॲलिटीचा अनुभव होऊ शकतो. यातून फायदा हा होईल की, बसल्याजागी हे सर्व पाहता येतं, अनुभवता येतं. प्राण्यांचा आकार, प्राण्यांची हालचाल, प्राण्यांचा आवाज हे त्यांना हातातल्या मोबाईलच्या माध्यमातून अनुभवता येतं भविष्यामध्ये यामध्ये भरपूर असे पर्याय उपलब्ध होतील असं आत्ताच्या एकंदर स्थितीवरून वाटतं कारण याचा वापर आता वाढताना दिसतोय. त्यामुळे सहाजिकच वेगवेगळ्या कंपन्या यावर स्वतःची निर्मिती करण्याचा आणि शिक्षणामध्ये 4D चा अनुभव देण्याचा प्रयत्न करतील. सहाजिकच भविष्य सराईतपणे वापरलं जाणारं हे माध्यम आजच आपण वापरु या. जेणेकरून भविष्यातल्या येणार्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला आपण एक चांगल्या पद्धतीने सामोरे जाऊ शकतो. आणि मुलांच्या ज्ञानामध्ये एक वेगळा अनुभव देऊन काही प्रमाणात का होईना या माध्यमातून भर घालू शकतो असं मला वाटतं.
Share Post