सर फाऊंडेशन बेळगाव कर्नाटक राज्य आयोजित 'कोविड काळातील शिक्षण' या वेबिनार मध्ये राज्य तंत्रस्नेही शिक्षक राजकिरण चव्हाण यांनी शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर याविषयी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रमुख्याने बेळगावातील मराठी बांधव या व्यवसाय उपस्थित होते 100 हून अधिक शिक्षकांनी तंत्रज्ञानाचा शिक्षणातील वापर कसा करावा? यासंदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. जेणेकरून या काळामध्ये 'शाळा बंद पण शिक्षण चालू' हा उपक्रम आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने घेता येईल यासाठी या आयोजन करण्यात आले. या वेबिनार च्या यशस्वितेसाठी सर फाऊंडेशन बेळगाव चे जिल्हा समन्वयक अजित सावंत व त्यांच्या टीमने खूप परिश्रम घेतले.